आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रदूषण आणि ताणामुळे शरीर थकते. वाहनांचे धुर, कामाचा ताण, अपुरी झोप – हे सगळं शरीरातील महत्वाचे पोषक घटक कमी करतात. शरीर योग्यरित्या काम करण्यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते.
संतुलित आहार आणि व्यायाम खूप महत्त्वाचे असले तरी रोजच्या गडबडीत हे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये मिळत नाहीत. अशा वेळी IV हायड्रेशन थेरपी खूप उपयोगी ठरते.
ग्लुटाथायोन हे शरीरात तयार होणारे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. हे शरीर डिटॉक्स करण्याचे, पेशींना नुकसानापासून वाचवण्याचे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. परंतु गोळ्या किंवा क्रीमच्या स्वरूपात घेतल्यास याचा पूर्ण फायदा मिळत नाही.
IV ग्लुटाथायोन थेरपी हे अधिक प्रभावी पर्याय आहे. ही थेरपी थेट रक्तात दिल्याने शरीराला त्याचा फायदा अधिक चांगल्या प्रकारे होतो. फायदे खालीलप्रमाणे:
शरीरातील विषारी घटकांची सफाई: ग्लुटाथायोन शरीरातील टॉक्सिन्स आणि फ्री रेडिकल्स काढून टाकण्यास मदत करते.
ऊर्जा वाढवणे: हे पेशींतील ऊर्जा निर्मितीस मदत करते, ज्यामुळे थकवा कमी होतो.
पेशींचे संरक्षण: हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून पेशींचे संरक्षण करते आणि एकूणच आरोग्य सुधारते.
ही थेरपी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. शरीरातून टॉक्सिन्स काढून टाकल्यामुळे त्वचा अधिक उजळ आणि निरोगी दिसते.
आमचा तज्ञ डॉक्टर्सचा संघ तुमच्या गरजेनुसार IV थेरपी प्लॅन तयार करून तुम्हाला ताजेतवाने, निरोगी आणि उर्जायुक्त बनवण्यास मदत करेल.